एक वेड, एक झिंग, बेभानपणा, एक वेगळीच धूंदी ! ढोल आणि ताशा हि ज्यांची आराध्य दैवत, त्यांच्यासाठी हि एक पवित्र उपासना. ह्यांची यथासांग पूजा करून मगच ही वाद्य हातात घेतली जातात .
तशा वर काड्या वाकतात खणखणीत तुकडा वाजविला जातो. तो थांबतो तेव्हा हातात तिपरु आणि कमरेला ढोल बांधलेले सज्ज असतात पुढच्या थारारासाठी ... ढ म म !
… आणि इथून सुरु होतो एक जल्लोष, हाच जल्लोष, हे वेद, ह्यावरच्या प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी, तो आवाज कानात साठीविण्यासाठी बेधुंद बेहोषीचे ते क्षण पाहण्यासाठी घेऊन आलो आहोत हेय नवीन सांकेतिक स्थळ - "ढोल ताशा - एक नशा "